पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतचा बहुप्रतिक्षित असलेला इमर्जन्सी चित्रपट हा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना राणावत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत असून अभिनेता अनुपम खेर आणि श्रेयश तळपदे हे जयप्रकाश नारायण तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत पाहिला मिळत आहेत. या चित्रपटासाठी 25 कोटी रुपये खर्च केला असून हा चित्रपट इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणी आणि काँग्रेस काळात घडलेल्या घटना यामध्ये पाहिला मिळत आहेत. पुणेकरांना नेमका हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं.
advertisement
पुणेकरांना नेमका चित्रपट कसा वाटला?
चित्रपट छान आहे. त्या काळात काँग्रेसचे जे निर्णय होते ते कसे होते हे बघायला मिळालं. तसंच अक्टिंग ही चांगली होती. त्याकाळात कसं झालं असेल हे सगळं डोळ्यासमोर येत होत. काँग्रेसचा जो काळ होता तो देशासाठी सुवर्णकाळ ठरला आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी खूप काही केलं आहे, असं प्रेक्षकाने सांगितले.
'जिलबी' गोड नाय पण गुढ नक्की, स्वप्निल आणि शिवानीचा नवा सिनेमा कसा वाटला मुंबईकरांना? VIDEO
70 ते 80 च्या दशकात जे घडलं ते खूप खतरनाक होतं. मी त्या काळात नव्हतो पण माझे वडिलांचा जन्म हा त्या काळात झाला. त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या. जे घडलं आहे ते प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती मिळाली. आताच्या परिस्थितीत लोकांनी खरंच हा चित्रपट बघावा. त्या काळात घडलेल्या घटना या आजोबांनी सांगितल्यामुळे हा चित्रपट बघताना काही आठवल्या परंतु त्या यामध्ये दाखवल्या नाहीत. परंतु चित्रपट खरंच चांगला असून प्रत्येकाने तो बघितला पाहिजे, असंही एका प्रेक्षकाने सांगितलं.





