अमरावती : शृंगार आणि महिलांचे फार अतूट नाते आहे. त्यात आता लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्यामुळे महिला आपल्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. महिलांच्या सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे लांब केस. पण हिवाळ्यात केसात कोंडा होतो. त्याचबरोबर केस गळती सुद्धा सुरू होते. तेव्हा आपण अनेक घरगुती उपाय करतो. पण, केसातील कोंड्यासाठी घरगुती उपाय करणे हे खरचं योग्य आहे का? याबद्दलचं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
केसातील कोंड्यासाठी घरगुती उपाय करणे योग्य का?
केसातील कोंड्यासाठी घरगुती उपाय करणे अत्यंत हानिकारक होऊ शकतं. कारण घरगुती उपाय म्हणजे कोरफड, अंडी, दही, लिंबू यासारखे पदार्थ तुम्ही केसांना लावता. त्यानंतर केस धुवून घेता. पण काही वेळ केस धुतल्यानंतर सुद्धा केसांच्या मुळांशी या पदार्थाचे काही कण राहून जातात. त्यातून फंगल इन्पेक्शन तयार होते आणि केसातील कोंडा पुन्हा वाढू लागतो. हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे वारंवार घरगुती उपाय केले जातात आणि केसांची वाढ खुंटते, केस गळतात, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
हिवाळ्यात ओठांना कलरवाली लिपबाम लावत असाल तर थांबा, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐका! VIDEO
त्याचबरोबर केसांना तेल सुद्धा लावणे टाळायला पाहिजे. पण तुमचे केस खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही अंघोळीच्या अर्धा तास आधी खोबरेल तेल लावू शकता. तेव्हा सुद्धा तेल गरम वैगरे करण्याची गरज नाही. साधं तेल लावा त्याने तुम्हाला कोरड्या केसांची समस्या सोडवण्यास मदत होईल.
काही वेळ यूट्यूब बघून सुद्धा केसांवर अनेक उपाय केले जातात. घरीच वेगवेगळे पदार्थ मिक्स करून तेल बनवले जातात. त्यामुळे सुद्धा केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती उपाय टाळून केसांच्या समस्या उद्भवल्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या केसांना सूट होईल असे प्रॉडक्ट डॉक्टरांकडून लिहून घ्यावे. असे केल्यास केसांच्या समस्या वाढण्या आधी त्यावर उपाय केले जातात, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.





