TRENDING:

Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील

Last Updated:

How to get rid off sticky glue on hands : वस्तू चिकटवण्यासाठी फेव्हिक्विक खूप चांगले आहे. पण ते वापरताना काळजी घ्यावी लागते. कारण ते जर हाताला चिकटलं तर लवकर निघत नाही आणि त्याचा घट्ट थर हाताला लागून राहतो.

advertisement
मुंबई : घरात काहीतरी तुटलं-फुटलं की हल्ली ते फेव्हिक्विकने चिकटवले जाते. याने वस्तू खूप चांगल्या आणि पटकन चिकटल्या जातात. वस्तू चिकटवण्यासाठी ते खूप चांगले आहे. पण ते वापरताना काळजी घ्यावी लागते. कारण ते जर हाताला चिकटलं तर लवकर निघत नाही आणि त्याचा घट्ट थर हाताला लागून राहतो. त्यातही जर याने बोटं एकमेकांना चिकटली तर लोक आधी घाबरतात.
या 3 उपायांनी सहज मोकळी होतील बोटं..
या 3 उपायांनी सहज मोकळी होतील बोटं..
advertisement

फेव्हिक्विकने बोटं चिकटल्यावर ती की लवकर निघत नाहीत आणि यामुळे घाबरायला होतं. पण यावर काही सोपे उपाय आहेत. जे तुमच्या हातांना लागलेला ग्लू चौटाकीसरशी काढतील.

या 3 उपायांनी सहज मोकळी होतील बोटं..

नेलपेंट रिमूव्हर : नेलपेंट रिमूव्हरमधील अ‍ॅसीटोन फेविक्विक काढण्यास मदत करते. नेलपेंट रिमूव्हरमध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि जिथे ग्लू लागला आहे तिथे ते लावा. याने ग्लू सैल होऊन निघेल. यानंतर बोटं हळुवार मोकळी करा. अ‍ॅसीटोनमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणून नंतर मॉइश्चरायझर नक्की लावा.

advertisement

मीठ आणि पाणी : मीठ आणि पाणी या चिकटलेल्या बोटांवर स्क्रबर म्हणून काम करते. मीठ आणि पाण्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट बोटांमध्ये काही सेकंद घासा. यामुळे वेदना होत नाही आणि बोटंही सहज मोकळी होतात.

तेल/पेट्रोलियम जेली : तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वरील उपाय करण्यापेक्षा तुम्ही तेल किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. बोटांवर नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा व्हॅसलीन लावा. यामुळे ग्लू सैल होईल आणि हळूहळू निघेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल