पण आता काळजी करु नका आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे काळे पकडे पांढरे होणार नाही किंवा त्यावर पांढरा फेड येणार नाही.
व्हिनेगरचा वापर करून करा डागांचा अंत
जर तुमच्या काळ्या कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग राहिले असतील, तर एक स्प्रे बॉटलमध्ये अर्धं पाणी आणि अर्धं पांढरं व्हिनेगर (white vinegar) मिसळा. हे मिश्रण डागांवर स्प्रे करा आणि हलकं हाताने रगडा. काही मिनिटांनी कपडा स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिनेगर कपड्यातील डिटर्जंटचे अवशेष काढून टाकतं आणि कपड्याला पुन्हा मऊ बनवतं.
advertisement
लिंबाचा रस आहे नैसर्गिक क्लिनर
काळ्या कपड्यांवर लिंबाचा रस वापरणं हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. जिथे पांढरे डाग आहेत तिथे लिंबाचा रस लावून काही मिनिटं ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवा. लिंबातील सिट्रिक ऍसिड पांढरे डाग नैसर्गिकरीत्या विरघळवते आणि कपड्याला नव्यासारखे करते.
ऍल्युमिनियम फॉईलने थांबवा लिंट आणि डाग
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना एक छोटीशी ट्रिक मोठा फरक करू शकते. कपडे धुण्यापूर्वी डिटर्जंटसोबत अॅल्युमिनियम फॉईलचा एक छोटा गोळा टाका. हे फॉईल लिंट आणि डिटर्जंटचे अवशेष शोषून घेतं, ज्यामुळे कपड्यांवर पांढरे डाग राहत नाहीत. हाताने धुताना देखील ही युक्ती वापरता येते.
बेकिंग सोड्याने होईल चमत्कार
बेकिंग सोडा हा काळ्या कपड्यांसाठी जणू जादूचा घटक आहे. कपडे भिजवताना त्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा टाका. यामुळे डिटर्जंट पूर्णपणे विरघळतं आणि पांढरे डाग तयार होत नाहीत. याशिवाय कपडे अधिक मऊ आणि सुगंधीही राहतात.
कोमट पाणी सर्वोत्तम
कपडे नेहमी हलक्या कोमट पाण्यात धुवा. फार गरम पाण्यामुळे कपड्यांचा रंग उतरू शकतो, तर थंड पाण्यात डिटर्जंट व्यवस्थित विरघळत नाही. त्यामुळे मध्यम तापमानाचं पाणी सर्वोत्तम असतं. तसेच काळे कपडे कधीही थेट उन्हात सुकवू नका सावलीत वाळवले तर रंग आणि गुणवत्ता दोन्ही टिकतात.
या घरगुती उपायांनी तुम्ही काळ्या कपड्यांवरील पांढरे डाग सहज काढू शकता आणि तुमचे आवडते कपडे दीर्घकाळ नवेच दिसतील.
