TRENDING:

न पुसणारी पोर्टेबल रांगोळी पाहिलीये का? महिलांची घरबसल्या होतेय हजारोंची कमाई, Video

Last Updated:

सण आर्ट रांगोळीचं वैशिष्ट्ये म्हणजे ही पोर्टेबल असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: रांगोळी म्हंटलं की मोठ्ठी संस्कार भारती, वेगवेगळ्या डिझाईन्स किंवा ठिपक्यांची रांगोळी डोळ्यासमोर येते. मात्र या रांगोळ्या साकारण्यासाठी भरपूर वेळ लागतो. सणासुदीला महिलांना या रांगोळी काढणे शक्यच होत नाही. त्यामुळे वर्ध्याच्या आर्वीतील एम.टेक.चं शिक्षण झालेल्या सोनाली अग्रवाल यांनी भन्नाट आयडिया शोधून काढलीये. विशेष म्हणजे या सण आर्ट रांगोळी व्यवसायातून त्यांना चांगली मिळकतही होतेय. आज शेकडो गृहिणी आणि मुलींनी स्वतःचा रांगोळी व्यवसाय सुरू केला असून त्यांना रोजगार मिळाला आहे.

advertisement

पाण्याने खराब न होणारी रांगोळी

सोनाली अग्रवाल यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून आगळ्यावेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तयार केल्या आहेत. ज्या पाण्याने खराब होत नाही आणि रांगोळ्या पोर्च मध्ये, जमिनीवर, भिंतीवर, टेबलवर सहज सजवल्या जातात. या प्रकारची रांगोळी बनविण्यासाठी ओ.एच.पी शीट चा वापर केला जातो. त्यावर बनलेल्या रांगोळ्या ठेवाव्या लागतात. यामध्ये तीन प्रकारच्या लेयर असतात. त्यांना सुकण्यासाठी 7-8 तासांचा कालावधी लागतो आणि पाण्याने सुद्धा खराब होत नाही. वर्षानुवर्षे या रांगोळ्या साठवून ठेऊ शकतो. या रांगोळ्यांचं वैशिष्ट्ये म्हणजे या पोर्टेबल असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. भिंतीवर, डायनिंग टेबलवर सहज काही मिनिटांत सजविण्यात येते.

advertisement

आकर्षक निमंत्रण पत्रिका टाकून देताय? अर्ध्या तासात बनवा सुंदर फ्लॉवर पॉट, Video

वृद्ध महिलाही घेताहेत प्रशिक्षण

सोनाली या रांगोळ्याचे ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षनाचे वर्गही घेतात. त्यांच्याकडे आतापर्यंत 100 च्या वर महिला विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सोनाली यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या महिला विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून त्या 50-60 हजार रुपये कमावत आहेत. या परीक्षण वर्गात 62 वर्षा पर्यंतच्या महिला सुद्धा आहेत ज्या रांगोळीचे प्रशिक्षण घेत आहेत.

advertisement

हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरीला मागणी, PHOTOS पाहाल तर प्रेमात पडाल

वेगवेगळ्या रांगोळ्या केल्या तयार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

या सण रांगोळी प्रकारामध्ये आता पर्यंत मोर, कृष्ण, गुलाब फुल, कमळ फुल, राम, अयोध्या रामंदिर अश्या बऱ्याच प्रकारच्या रांगोळ्या सोनाली यांनी तयार केलेल्या आहेत. सोनाली यांनी महिलांना रांगोळी काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत करून आगळ्यावेगळ्या व्यवसायाची कल्पना देखील दिलीय. त्यामुळे सर्व महिला वर्गाकडून सोनाली यांच्या कलेचं कौतुक केलं जातंय.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
न पुसणारी पोर्टेबल रांगोळी पाहिलीये का? महिलांची घरबसल्या होतेय हजारोंची कमाई, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल