तुम्ही या नवीन वर्षात एका छोट्या पण मजेदार सहलीची योजना आखत असाल, तर आम्ही तुम्हाला आम्ही पाच बजेट फ्रेन्डली ठिकाणांबद्दल माहिती देत आहोत. या ठिकाणी तुम्ही नक्कीच एक सुंदर सुट्टी घालवू शकला. यात तुम्हाला समुद्रकिनारे, पर्वत, धार्मिक स्थळं देखील एक्सप्लोर करता येतील.
तारकर्ली, रत्नागिरी
तारकर्ली हे कोकणातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, रत्नागिरीपासून काही अंतरावर आहे. येथे पर्यटन, साहसी क्रिडा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम अनुभवता येतो. तारकर्ली हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय स्कुबा डायव्हिंग स्पॉट आहे. स्वच्छ, नितळ पाण्यात रंगीबेरंगी मासे, प्रवाळ आणि समुद्री जग पाहण्याचा अतिशय सुंदर अनुभव येथे मिळतो. सकाळी समुद्रात बोटीने फिरताना डॉल्फिन दिसणे ही तारकर्लीची खासियत. हा अनुभव पर्यटकांचं खास आकर्षण ठरतो. येथे 1000 ते 1500 रुपयांपर्यंत चांगली निवासव्यवस्था मिळू शकते.
advertisement
येथे काय काय करता येईल?
1. स्कुबा डायव्हिंग
2. स्नॉर्केलिंग
3. वॉटर स्पोर्ट्स (जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, पॅरासेलिंग)
4. डॉल्फिन सफारी
5. तुम्ही येथे सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग संगम पॉईंट, बीचवर रिलॅक्सेशन करू शकता
6. स्थानिक कोकणी जेवणाचा अस्वाद घेऊ शकता.
ऋषिकेश, उत्तराखंड
तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात शांतता आणि साहसाच्या मिश्रणाने करायची असेल, तर ऋषिकेश हे देखील एक उत्तम ठिकाण आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर शांत आणि साहसाने भरलेले आहे. येथे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत निवास सुविधा मिळतील. तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. तुम्ही येथे 250 रुपये ते 500 रुपयांमध्ये राहू शकता. भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते एप्रिल आहे. येथे 1000 ते 1500 रुपयांपर्यंत चांगली निवासव्यवस्था मिळू शकते.
येथे काय काय करता येईल?
रिव्हर राफ्टिंग
लक्ष्मण झुला भेट
मोफत योग सत्र
संध्याकाळची गंगा आरती
नदीकाठी असलेल्या छोट्या समुद्रकिनाऱ्यांवर वेळ घालवणे
जयपूर, राजस्थान
तुम्हाला या नवीन वर्षात थोडे राजेशाही जीवन अनुभवायचे असेल पण जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर जयपूर तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. तुम्ही येथे राजवाडे, किल्ले, बाजारपेठा फिरू शकता आणि स्थानिक जेवनाचा अस्वाद घेऊ शकता. येथे तुम्हाला अनेक स्वस्त वसतिगृहे आणि हॉटेल्स मिळतील. स्थानिक स्ट्रीट फूड अगदी कमी किमतीत मिळतात. बहुतेक किल्ल्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी 100 ते 200 रुपये शुल्क आकारले जाते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च आहे.
काय काय पाहू शकता?
आमेर किल्ला (सकाळी सुंदर दृश्य)
हवा महल
सिटी पॅलेस
जोहरी आणि बापू बाजारात खरेदी
कचोरी, दाल-बाटी, घेवरची चव चाखू शकता
वाराणसी, उत्तर प्रदेश
तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात शांती आणि सकारात्मकतेने करायची असेल, तर वाराणसी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. येथे, तुम्ही पैसे खर्च न करता बरेच काही पाहू आणि अनुभवू शकता. याता तुम्हाला बजेट फ्रेंडली गेस्ट हाऊसेस आणि हॉटेल्स मिळतील. परवडणारे स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही घाट, मंदिरे, सकाळची गंगा आरती, सर्वकाही मोफत अनुभवू शकता. परवडणाऱ्या किमतीत बोटीतून प्रवास देखील करू शकता.
येथे काय काय करू शकता?
सूर्योदयाच्या वेळी बोट राईड
दशाश्वमेध घाटावर गंगा आरती
काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्या.
सारनाथला भेट द्या
कचोरी-भाजी आणि बनारसी लस्सीचा अस्वाद घ्या.
गोवा
गोवा हे समुद्रकिनाऱ्यांचं, नाईटलाइफचं आणि पोर्तुगीज संस्कृतीचं रंगीबेरंगी ठिकाण आहे. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सुंदर बीचेस, प्राचीन फोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, कॅफे-नाईटलाइफ, मंदिरं, चर्च, निसर्ग आणि फूडीजसाठी जबरदस्त जागा अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. ऑक्टोबर ते मार्च येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम सीझन आहे. येथे तुम्हाला 1500 ते 2000 पर्यंत निवासव्यवस्था मिळू शकते.
गोव्यात काय काय करता येईल?
बीचेसची मजा
बागा बीच - वॉटर स्पोर्ट्स आणि नाईटलाइफ
कळंगुट बीच - फॅमिली क्राऊड
अंजुना बीच - कॅफे, शॉपिंग, सनसेट
मोरजी, मंदरम बीच - शांत आणि स्वच्छ
पालोलेम बीच - दक्षिण गोव्याचा शांत आणि सुंदर कोपरा
काय काय करू शकता?
वॉटर स्पोर्ट्स (पॅरासेलिंग, जेट स्की, बॅनाना राईड, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, कयाकिंग)
ऐतिहासिक किल्ले (अग्वाडा फोर्ट, चपोरा फोर्ट, काबो डी राम फोर्ट)
कॅफे आणि नाईटलाइफ (बीच शॅक्स, क्लब्स आणि नाईट क्लब्स, लाईव्ह म्युझिक, बीच पार्ट्या)
बॅकवॉटर आणि निसर्ग (मांडवी नदी क्रूझ, दुधसागर धबधबा, स्पाइस प्लांटेशन टूर, कोटिगाव, भगवंत महावीर अभयारण्य)
शॉपिंग (अंजुना फ्ली मार्केट, मापुसा मार्केट, कलंगुट-तितरापर्यंत बीच स्टॉल्स)
धार्मिक स्थळं (बॉम जीझस बॅसिलिका, सी कॅथेड्रल, श्री मंगेशी मंदिर, शांता दुर्गा मंदिर)
गोकर्ण, कर्नाटक
कर्नाटक हे स्वतःच एक सुंदर राज्य आहे. तुम्हाला गोव्यासारखेच समुद्रकिनाऱ्याचे वातावरण हवे असेल, परंतु गर्दी आणि जास्त किमती नको असतील, तर गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे. येथील समुद्रकिनारे शांत, स्वच्छ आणि आश्चर्यकारकपणे सुंदर आहेत.
येथे तुम्हाला स्वस्त समुद्रकिनाऱ्यावरील टेन्ट आणि वसतिगृहे मिळतील. परवडणाऱ्या किमतीत लोकल बस आणि ऑटो उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी ट्रेकिंग जवळजवळ मोफत आहे. कुडले आणि ओम बीच पाहू शकता.
येथे काय काय करू शकता?
समुद्रकिनारी ट्रेक (मोफत)
महाबळेश्वर मंदिर
हाफ मून बीचवर सूर्यास्त
बजेट सीफूडचा आनंद घेऊ शकता
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
