फिनलॅन्डच्या जवळजवळ प्रत्येक प्रदेशात तलाव पसरलेले आहेत. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हिमयुग संपत असताना मोठ्या हिमनद्यांच्या वितळण्यामुळे तयार झालेल्या खोलगट प्रदेशांमध्ये पाणी साचले आणि त्यातून हजारो नैसर्गिक तलाव निर्माण झाले. त्यामुळे हा देश आज युरोपमधील सर्वाधिक तलाव असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे.
फिनलॅन्डमधील या तलावांचे पाणी अत्यंत स्वच्छ असल्यामुळे ते फिनलॅन्डच्या पर्यावरणीय समतोलाला पाठबळ देतात. या तलावामुळे देशात वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, शेतीसाठी सुपीक माती आणि प्रदूषणमुक्त हवा हे सर्व टिकून आहे. या देशाने देखील या तलावांची नैसर्गिक स्थिती जपण्याचे काम केले आहे. त्यामुळेच त्याला 'हजारो तलावांची भूमी' शी ओळख प्राप्त झाली आहे.
advertisement
दैनंदिन जीवनात तलावांचे प्रतिबिंब
फिनिश लोकांसाठी तलाव हे फक्त सौंदर्यस्थळ नाहीत, तर त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. उन्हाळ्यात नागरिक पोहणे, कॅनोइंग, बोटिंग आणि मासेमारीचा आनंद घेतात. तर हिवाळ्यात हे तलाव पूर्णपणे गोठतात आणि नैसर्गिक आइस रिंक किंवा बर्फावरील मासेमारीचे केंद्र बनतात. अनेक कुटुंबांकडे तलावांच्या काठावर छोटे लाकडी ‘समर कॉटेज’ असतात आणि सुट्ट्यांमध्ये ते तिथे निवांत वेळ घालवतात. फिनिश कला, लोकसंगीत आणि परंपरांमध्येही या तलावांचे प्रतिबिंब दिसून येते.
फिनलॅन्डमधील सर्वात प्रसिद्ध तलाव
सैमा सरोवर : फिनलॅन्डमधील सर्वात मोठे आणि युरोपातील चौथ्या क्रमांकाचे हे विशाल सरोवर जगप्रसिद्ध आहे. येथे आढळणारा 'साइमा रिंग्ड सील' हा अत्यंत दुर्मिळ जीव केवळ या प्रदेशातच आढळतो.
पायजान सरोवर : क्रिस्टल-क्लीन म्हणजेच काचेसारख्या स्वच्च पाण्यासाठी ओळखले जाणारे हे सरोवर राजधानी हेलसिंकी शहराला पिण्याचे पाणी पुरवते. या पाण्याचा शुद्धतेचा स्तर इतका उच्च आहे की अनेक ठिकाणी हे पाणी थेट पिण्यासाठी योग्य असते.
इनारी सरोवर : उत्तर फिनलॅन्डच्या लॅपलॅन्ड प्रदेशात वसलेले हे सरोवर स्वच्छ बर्फाच्छादित जंगलांनी वेढलेले आहे. येथे ‘मध्यरात्रीचा सूर्या'चे अप्रतिम दृश्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गर्दी करतात.
काही आश्चर्यकारक तथ्ये
- फिनलॅन्डच्या भूभागातील जवळजवळ 10 टक्के क्षेत्र तलाव आणि नद्यांनी व्यापलेले आहे.
- अनेक तलाव इतके स्वच्छ आहेत की त्यांचे पाणी थेट पिण्यास योग्य असते.
- उन्हाळ्यात पोहणे आणि मासेमारी तर हिवाळ्यात ‘आइस स्केटिंग' आणि 'आइस फिशिंग’ अत्यंत लोकप्रिय आहेत.
- फिनिश संस्कृतीत तलाव शांतता, स्वच्छता आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानले जातात.
- अनेक राष्ट्रीय उत्सव आणि लोककथांमध्ये तलावांना विशेष स्थान आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
