या आजी दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून अहिल्यानगरच्या सुमन धामणे म्हणजेच सुमन आजी आहेत. त्यांना नेटकरी आपुलकीने आणि लाडाने सुमन आजी म्हणून हाक मारतात. सुमन आजींच्या व्हिडिओ युट्यूबवर कमालीच्या व्हायरल होत असतात. 74 वर्षीय सुमन आजी आपल्या रेसिपींच्या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर तुफान फेमस झाल्या आहेत. सध्याच्या जमान्यापासून लुप्त होत असलेल्या रेसिपीच्या व्हिडिओ त्या बनवायच्या. त्या व्हिडिओंनी प्रेक्षकांचे मन जिंकले. मीडिया रिपोर्टनुसार, सुमन आजी युट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 5 ते 6 लाख रूपयांच्या आसपासची कमाई करतात.
advertisement
मात्र, सुमन आजींनी आजच्या तरुणपिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. तो म्हणजे, व्हायरल होण्यासाठी शिक्षणाची कोणतीही गरज नाही, आपण आपल्या टॅलेंटच्या जोरावर नक्कीच तुफान व्हायरल होऊ शकतो. शिवाय, वयाला कोणतंही बंधन नसतं, ही गोष्ट देखील त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं. सुमन आजींचं युट्यूबवर "आपली आजी" नावाचं युट्यूब अकाऊंट आहे. या चॅनलचे 1.84 मिलियन सब्सक्रायबर आहेत. 2020 साली आजींनी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरु केलं होतं. यामागे त्यांच्या नातवाची कल्पना होती. सुमन आजींच्या नातवाने आजींचा पावभाजी बनवतानाचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर त्यांनी असे अनेक व्हिडिओ बनवायला सुरुवात केले.
सुमन आजींच्या आवाजातील गोडवा सर्वांच्याच मनाला भावला. त्यांच्या मिश्किल स्वभावाने आणि मनोरंजक व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची फॅन फॉलोविंग वाढवली. त्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर कोरोना काळामध्ये झपाट्याने वाढत गेले. त्यांना युट्यूबकडून सिल्व्हर प्ले बटणदेखील मिळाले आहे. सुमन आजींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. सुमन आजींचा युट्यूबवरील प्रवास फार खडतर होता. त्या कॅमेरा समोर येण्यास खूप घाबरत होत्या. त्यांना तांत्रिक गोष्टीही समज नव्हत्या. परंतु त्यांनी तरीही जिद्द सोडली नाही. नातवाकडून नवीन गोष्टी शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपला प्रवास सुरु केला. आज त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.
