या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा केला त्यावेळी दागिने आणि पैसे घेऊन चोर फरार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला. सोनं घेऊन फरार झालेल्या कारागिरांच्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आलं. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरट्यांकडून ५१ लाख १२ हजार ७९५ रुपये किमतीचे सोनं ताब्यात घेतलं आहे.
advertisement
उरलेलं सोनं आणि रोख रक्कम चोरांनी काय केली याची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या अटकेची माहिती दिली. "शहरात मोठी चोरी करून हे कारागीर आपल्या मूळ गावी पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा मागोवा घेतला आणि पश्चिम बंगालमध्ये धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले."
पोलीस निरीक्षक कबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील चौघांचा समावेश आहे. यातले तीन जण हुगळी तर एक हावरा इथला असल्याची माहिती मिळाली आहे,. सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक, अनिमेश मनोरंजन दोलुई, सोमनाथ जगन्नाथ सामंता अशी आरोपींची नावं आहेत. अहिल्यानगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील सोने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
