डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार असून पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याची पोलिसांचे म्हणणे आहे. अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला तेव्हा ती मृत झाल्याचे कळताच त्याने स्वत:चे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
advertisement
अनंत गर्जेच्या वकिलांनी काय सांगितले?
अनंत गर्जेच्या वकिलांनी दिलेल्य माहितीनुसार, अनंताच्या शरीरावर जखमा होत्या, मी त्याच्याकडून माहिती घेतली. यातल्या काही जखमा जुन्या, काही त्या दिवशी झाल्या. 5.12 ला वरळीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. वरळीच्या ऑफिसला गेले 5.22 ला, वरळीच्या ऑफिसून 5.32 ला विमानतळाच्या दिशेने निघाले, त्यांना गौरीचा फोन आला. घरी परत वळाले, घरी जाऊन दरवाजा वाजवला, आवाज ऐकून 2 बायका आल्या. गर्जे रेफ्युजी एरियातून घरात शिरला आणि गौरीला उतरवत पोद्दारला घेऊन गेला, त्यानंतर तिथे कळलं की गौरी गेली त्यामुळे त्यांनी स्वतःला मारून घेतलं त्याच्या जखमा आहेत, हे सर्व CCTV फुटेज पोलिसांकडे आहे.
अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
तसेच, पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवला आहे. पोलिसानी जाळ्या बसवणाऱ्या व्यक्तीलाच जाळीतून आतमध्ये प्रवेश करता येतो का याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगितले आणि चित्रीकरण केलेले आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, लवकरच जामिनाला अर्ज करु ,असे देखील अनंत गर्जेच्या वकिलांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब घेतल्याची माहिती दिली आहे.
हे ही वाचा :
