समोर आलेल्या माहितीनुसर, प्रशांत बापू चौधरी आणि त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीनंतर नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, सौन्या उल्हारे, धरम महारनौर, अजय साबळे, दुर्गेश साबळे आणि नारायण कोळेकरच्या पत्नीसह सात-आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
शिवीगाळ करत केली मारहाण
या प्रकरणी समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत आणि त्यांचा चुलतभाई हे दोघे रुईछत्तीशी येथून आठवडा बाजार करून घरी परतत होते. वाटेफळ येथील बस स्टँडवर मित्र दीपक कराळे याची वाट पाहत थांबले असता दोघांना लघुशंका आल्याने त्यांनी बस स्टँडच्या आडोशाला लघुशंका केली. यावेळे तिथे उपस्थित असणाऱ्या नारायण कोळेकर यांनी त्यांना हटकले आणि म्हणाले, येथे लघुशंका करायची जागा आहे का? इथे आमच्या बायका असतात, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. मात्र प्रशांत आणि त्यांच्या चुलतभावाने तात्काळ त्यांच्याकडे घडलेल्या प्रकाराविषयी माफी मागितली.
लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण
तोपर्यंत नारायण कोळेकर आणि त्यांच्या भावाला बोलवत काही न ऐकता प्रशांत यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बर एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी इतर मित्रांना फोन करत बोलावले आणि पुन्हा नऊ जणांनी मिळून लोखंडी रॉड, लोखंडी गजाने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केली केली. या मारहाणीच प्रशांत यांचा चुलतभाऊ भाऊसाहेब बेशुद्ध झाले.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने मारले त्याच पद्धतीने मारहाणीच्या दुसऱ्या घटनेने बीड हादरले आहे. या नंतर पुन्हा बीड जिल्हातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
