आईवर जीवघेणा हल्ला..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्यानंतर त्याचे घरी आईसोबत किरकोळ कारणांवरून वारंवार खटके उडत होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दोघांमध्ये मोठं भांडण झाले आणि रागाच्या भरात मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला, ज्यात आईचा मृत्यू झाला.
आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितलं की, घरगुती कलहातून ही हत्या झाली असावी. मात्र, यामागील नेमकं कारण आणि अधिक तपशील पोलीस तपासाअंती समोर येईल. या घटनेमुळे संपूर्ण येल्डा गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून, एका वयोवृद्ध आईची तिच्याच मुलाने केलेली हत्या सर्वांना सुन्न करून गेली आहे.
बीडमधील गुन्हेगारीच्या घटना
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. काल बीडमध्ये डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे ही घटना घडली. लोखंडी रोडने डॉक्टर दांपत्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं.
