संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना डीवायएसपी विश्वांभर गोल्डे यांनी जबाब दिला. त्यांचा हा जबाब 23 फेब्रुवारी 2025 रोजी नोंदवण्यात आला.
कराड हा तुरुंगात असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचे गोल्डे यांनी म्हटले. कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलिस दोन कर्मचारी देऊन त्याला संरक्षण देत होते, याची माहितीदेखील अधिकृतपणे समोर आली आहे.
advertisement
कराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. परंतु, त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात 18 अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी ठेवले होते. तसेच 22 जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते, असे गोल्डे यांनी म्हटले आहे.
