TRENDING:

सिस्टिमचं सगळ्यात मोठं फेल्युअर....! मुख्यमंत्री फडणवीस संतापले, मतमोजणी लांबणीवर गेल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांतच पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

''मी अजून पूर्ण निकाल वाचला नाही. मात्र तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर सर्वांनाच मान्य करावा लागेल. 30 वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहातोय, असं पहिल्यांदाच घडतंय की निवडणुका पुढे चालल्या आहेत.''

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. तर निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र यासंदर्भात अचानक नागपूर खंडपीठाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय आला आणि सगळीच चक्र फिरली.सर्व मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र ही न होता आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नागपूर खंडपीठाने हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे.
उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप,  'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
advertisement

मुख्यमंत्र्‍यांची पहिली प्रतिक्रिया

मी अजून पूर्ण निकाल वाचला नाही. मात्र तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर सर्वांनाच मान्य करावा लागेल. 30 वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहातोय, असं पहिल्यांदाच घडतंय की निवडणुका पुढे चालल्या आहेत. त्याचे निकाल पुढे चालले आहेत. एकूणच ही पद्धत फार काही योग्य वाटत नाही. नागपूर खंडपीठ आणि निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांनी निकाल दिला तो मान्य करावा लागेल. जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात त्या सगळ्यांचा भ्रमनिरास होतो. सिस्टिम फेल्युअरमुळे काही चूक नसताना त्या ठिकाणी असं सगळं होणं काही योग्य वाटत नाही. अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. यापुढच्या निवडणुकांमध्ये या गोष्टी होणार नाहीत ते निवडणूक आयोगाने येत्या काळात पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आता माझं मत असं आहे जो काही कायदा आहे त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन करण्यात आले. मी त्यांचा मान राखून सांगतो की खूपच चुकीचे इंटरप्रिटेशन आहे. ज्या लोकांनी कोर्टात धाव घेतली, त्या ठिकाणी त्याने दिलासा ही दिला नाही. हे खूप चुकीचे आहे. मी कालही माझी नाराजी दर्शवली आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीर होत नाहीए यावर नाराज आहे. काही जणांसाठी २८४ सगळी मतमोजणी थांबवणे योग्य नाही. सगळेच एकमेकांवर आरोप करतात. निवडणूक आयोग आणि पोलिस सज्ज आहेत. मला वाटतं निवडणुका ओव्हर ॲाल शांतपणे पार पडल्या आहेत. काही ठिकाणी टोकाचे झाले तेवढे योग्य नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिस्टिमचं सगळ्यात मोठं फेल्युअर....! मुख्यमंत्री फडणवीस संतापले, मतमोजणी लांबणीवर गेल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांतच पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल