राजकारणातील दोन प्रमुख चेहरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसले. एका विवाहसोहळ्याला हे दोन्ही नेते उपस्थित राहिले आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले. लग्न सोहळ्यात दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांनी लग्न समारंभाला हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्यातील फोटो शरद पवारांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात. सत्तेतील बदल, आघाड्या आणि विरोधकांच्या समीकरणांमध्ये अनेकदा हे दोघे समोरासमोर आले आहेत. परंतु, वैयक्तिक पातळीवर त्यांच्यातील आदर आणि सभ्यता कायम दिसून येते. या विवाहसोहळ्यातील त्यांच्या भेटीने पुन्हा एकदा याच गोष्टीची आठवण करून दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा भेटींना वेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. काही जणांनी या फोटोला राजकारणापलीकडील सुसंवादाचे उदाहरण म्हटले आहे, तर काहींनी आगामी समीकरणांचे संकेत असल्याची चर्चा सुरू केली आहे. मात्र या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार–फडणवीस यांची ही अनपेक्षित भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
