छत्रपती संभाजीनगर : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून मोठ्या भावाची जागा मिळवली आहे. तर नितीशकुमार यांच्या जेडीयूनेही सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडीची धुळधान उडाली आहे. महागठबंधनच्या पराभावावरून आता महाराष्ट्रात मविआमध्ये फटाके फुटायला लागले आहे. 'बिहारमध्ये जागा वाटपात उशीर केला, जास्त जागा हव्या आणि निवडणूक कमी येतात. आता तरी काँग्रेसने ही वृत्ती बदलायला हवी' अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
advertisement
बिहार निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या वाट्याला फक्त ४ जागा येताना दिसत आहे. तर आरजेडीला २६ जागा मिळणार असं चित्र आहे. या निकालावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. बिहार पराभवानंतर माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
'काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या आहेत, काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवं, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चूक बिहारमध्ये केली, अशी टीका दानवेंनी केली.
तसंच, भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपद चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते, विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, असं परखड मत दानवेंनी मांडलं.
'मतदार यादी घोळ कायम आहेच. बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे. मात्र जागावाटप अखेरच्या दिवसापर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो. महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते, जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच बिहारमध्ये झाली, काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी, असा टोलाही दानवेंनी लगावला.
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न -संजय राऊत
तर, 'बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न आहे. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना 50 च्या आत संपवलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
