डॉ. वळसंगकर यांची सुसाइड नोट सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनिषा माने हीला अटक केली. सध्या तिला कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी (18 एप्रिल) आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर आल्या आहेत.
स्वत: उभारलेल्या रुग्णालयात अवहेलना...
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. वळसंगकर यांना स्वत: उभारलेल्या रुग्णालयात अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत होते. डॉ. वळसंगकर यांना ओपीडीच्या रुग्णाबाबतचे अधिकार होते. मात्र, त्यांनी सांगितलेल्या ओळखीच्या, गरजू रुग्णांचे बिल कमी केले जात नव्हते. त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही, अशी चर्चा सुरू आहे.
advertisement
सासऱ्यांचा हस्तक्षेप वाढला, सून नाराज?
रुग्णालयातील अधिकार सुनेला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुनेलाच रुग्णालयात डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे. सून आणि मुलाचा अंतर्गत कलह सुरू होता. या कलहाचा परिणाम रुग्णालयाच्या कामकाजावर, रुग्णांवर होऊ नये यासाठी डॉ. शिरीष वळसंगकरांचे रुग्णालयात येणे वाढले होते. डॉ. वळसंगकरांचे रुग्णालयात पुन्हा येणे हे सुनेला आणि मुलाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
आत्महत्येचा विचार आधीपासून मनात?
डॉ. वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्या. त्यावेळी नेहा या आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या. डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांची कन्या अचानकपणे सोलापुरात आल्याने चर्चा सुरू झालेल्या. मात्र, डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत असावा आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधीच मृत्यूपत्र बदलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ो