TRENDING:

Dr. Shirish Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसही हैराण, समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

Dr. Shirish Valsangkar Case: विख्यात मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी पुरावे शोधण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकाची धडपड सुरू आहे. आरोपी मनीषा माने-मुसळे ही सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: विख्यात मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी पुरावे शोधण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकाची धडपड सुरू आहे. आरोपी मनीषा माने-मुसळे ही सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू आहे. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आणखी एका अँगलने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
News18
News18
advertisement

सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. सोलापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहे. मात्र, पोलीस अद्यापही ठोस पुराव्यांच्या शोधात आहेत.

पोलिसही हैराण...

आरोपी मनीषा माने-मुसळेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे कॉल रेकॉर्डिंग तर दररोज दोन-तीनदा ऐकलं जात आहे. आरोपी मनीषाची न्यायालयीन कोठडी 9 मे रोजी संपणार आहे. मनिषाची पुन्हा पोलीस कोठडी मागण्यासाठी तपास पथकाला सबळ पुरावा हाती लागत नसल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

advertisement

पोलिसांनी डॉ. वळसंगकरांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र, या चौकशीतही हाती फारसं काही लागलं नाही. पोलिसांकडून आत्महत्या प्रकरणात आता दुसरा अँगलने तपास केला जात आहे.

तपासाचा अँगल काय?

पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता बाळगली असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहिती आधारे, पोलिसांचा तपास आणखी एका दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. वळसंगकर हे स्वतःवर गोळ्या झाडण्यापूर्वी तणावाखाली होते, असे म्हटले जात आहे. ही त्यांची तणावाची मानसिक स्थिती नेमक्या किती दिवसांपासून होती आणि या स्थितीला मनिषाशिवाय आणखीन कोण जबाबदार आहेत का? ही या तपासाची दुसरी दिशा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

आत्महत्येचा विचार आधीपासून मनात?

डॉ. वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्या. त्यावेळी नेहा या आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या. डॉक्टरांनी आत्महत्या केली, त्या दिवशीच्या सुमारास त्यांची कन्या अचानकपणे सोलापुरात आल्याने चर्चा सुरू झालेल्या. मात्र, डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत असावा आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधीच मृत्यूपत्र बदलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dr. Shirish Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसही हैराण, समोर आली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल