फरार असलेले आरोपी हे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत, याचाच अर्थ ते जवळपासच आहेत. इथल्या राजकीय 'आका'चे संरक्षण असल्यानेच आरोपी फरार आहेत आणि पोलिसांचेही त्यांना अभय आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला. राजकीय आकाचे संरक्षण असल्यानेच पोलीस त्यांना अटक करायला धजावत नाहीत, असे खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी प्रकार घडलेला असूनही...
advertisement
छेडछाड प्रकरणाला दहा दिवस पूर्ण झाले मात्र अजूनही पूर्णपणे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना यश आलेले नाही. महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडलेली असताना सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत असतील तर दुर्दैव आहे. आकांच्या सूचनेमुळेच आरोपींना अटक करायला पोलीस धजावत नाहीत. मंत्री असो किंवा आमदार, कोणाच्याही मुलींबाबत असा प्रकार घडला तर पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करायला पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
लाडक्या बहीण योजनेवरून एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
सत्तेत आल्यावर एकवीसशे रुपये देणार असे सांगूनही सरकार टाळाटाळ करत आहे. आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर आहे. राज्याची तूट ही चाळीस हजार कोटीपर्यंत गेलेली आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला दहा वर्षे लागतील. ४६ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी शासन वापरणार आहे पण सरकार हा पैसा कुठून आणणार आहे? असा सवाल खडसे यांनी विचारला.
पुढच्या दोन महिन्यात सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देणेही शक्य होणार नाही
सर्वसामान्य जनतेवर कराचा बोजा बसवायचा आणि करात वाढ करायची, असेच शासन करणार आहे. पुढच्या दोन महिन्यात सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देणेही शक्य होणार नाही. हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेले आहे, असे खडसे म्हणाले.
