TRENDING:

Indurikar Maharaj: माझ्यापर्यंत ठीक पण आता माझ्या लेकीवर... साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर घेणार मोठा निर्णय, म्हणाले फेटा..

Last Updated:

लेकीच्या शाही साखरपुड्यावर झालेल्या टीकेनंतर इंदुरीकर महाराज प्रचंड दु:खी झाले असून ते आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या कार्यक्रमावर प्रचंड खर्च करण्यात आला, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे. इंदुरीकर महाराज आपल्या प्रत्येक किर्तनात सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा आणि त्यांनी मात्र लेकीचा साखरपुडा अतिशय शाही पद्धतीने केला. लेकीचा साखरपुडा अतिशय शाही पद्धतीने केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाले. त्याला आता इंदुरीकर महाराज यांनी उत्तर दिलं आहे. मात्र अजूनही ही टीका थांबलेली नाही, या सर्व पार्श्वभूमीवर आता इंदुरीकर महाराज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Indurikar Maharaj
Indurikar Maharaj
advertisement

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे.  इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमातील काही चांगल्या गोष्टींवर लक्ष वेधले असले, तरी त्यांच्या उपदेशाच्या विपरीत साखरपुड्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर टीका काही थांबण्यांचे नाव घेत नाही, यामुळे इंदुरीकर महाराज प्रचंड दु:खी झाले असून ते तीन दशकं सुरू असलेली कीर्तन सेवा थांबण्याच्या विचारात असल्याचे बोलून दाखवले.

advertisement

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

आम्ही किती कष्ट केले याचा लोकं कधीच विचार करत नाही. आम्ही संसार कसा केला हे पण त्यांना माहीत नाही. मी आठ दिवस लेकरांना भेटत नव्हतो, आता लोकं इतके खाली गेले की आता माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलत आहे. मला लावा ओ घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. या लोकांनी माझं जगणं मुश्कील केलय. साखरपुड्यासाठी कपडे नवऱ्याकडचे आणतात एवढी अक्कल पाहिजे. लोकं किती नालायक असावा पण किती याला मर्यादा आहे. आता मी कंटाळलो आता मी क्लिप दोन ते तीन दिवसात टाकणार आहे. तीस वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या पण आता माझ्या घरावर आलेत. माझ्यापर्यंत टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही, त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्य विचारात आहे.

advertisement

शाही थाट चर्चेचा विषय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

इंदुरीकर महाराजांनी आपल्या लेकीचा ज्याप्रकारे थाटामाटात आणि अत्यंत आलिशान पद्धतीने साखरपुडा केला, त्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या.   वारकरी संप्रदायाकडूनही त्यांच्यावर टीका केली जातंय. इंदुरीकर महाराजांनी अनेकदा त्यांच्या किर्तनामध्ये लग्न साधी करा, असा समाजाला उपदेश दिला. मात्र, दुसरीकडे स्वत: च्या मुलीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण केली. लेकीची मंगल कार्यालयात शाही एन्ट्री… गाड्यांचा मोठा ताफा… ओपन जिप आणि मुलीचा गाडीच्या बाहेर येत तो शाही थाट चर्चेचा विषय बनला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indurikar Maharaj: माझ्यापर्यंत ठीक पण आता माझ्या लेकीवर... साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर घेणार मोठा निर्णय, म्हणाले फेटा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल