TRENDING:

युद्ध आखातात, झळा नाशिकच्या पंगतीला! 2000 वऱ्हाडी राहणार उपाशी; वधूपित्याची थेट प्रशासनाकडे धाव

Last Updated:

आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा केवळ गॅस सिलेंडरअभावी विस्कळीत होत असल्याने बेलसरे कुटुंबाने प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सातासमुद्रापार सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाची धग आता थेट नाशिकच्या लग्नसराईपर्यंत पोहोचली आहे. गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे शहरातील शेकडो विवाह सोहळ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, बेलसरे कुटुंबाची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. येत्या 14 मार्च रोजी खुशबू बेलसरे हिचा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र गॅस सिलेंडर मिळत नसल्याने दोन हजार पाहुण्यांना जेवण कसे घालायचे, या काळजीत संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस चिंतेत आहे.
News18
News18
advertisement

शहरातील ज्या लॉन्सवर लग्नाचा कार्यक्रम ठरला आहे, त्या लॉन्सचे मालक कैलास गुप्ता यांनी सिलेंडर उपलब्ध नसल्याचे कारण देत थेट हात वर केले आहेत. गॅस सिलेंडरची व्यवस्था तुम्हीच करा, तरच जेवण बनवता येईल, असे गुप्ता यांनी सांगितल्यामुळे बेलसरे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोन हजार पाहुण्यांचे निमंत्रण वाटून झाले असताना ऐनवेळी गॅस कोठून आणायचा, हा प्रश्न वधूपित्यासमोर उभा ठाकला आहे.

advertisement

मेन्यू बदलल्याशिवाय पर्याय नाही

गॅसच्या कमतरतेमुळे जेवणाचा ठरलेला मेन्यू बदलण्याची सूचनाही लॉन्स व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. जर गॅस मिळत नसेल, तर कमी इंधनावर होणारे पदार्थ बनवावे लागतील, असे सांगण्यात आल्याने बेलसरे कुटुंब आणि लॉन्स मालक यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे. आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा केवळ गॅस सिलेंडरअभावी विस्कळीत होत असल्याने बेलसरे कुटुंबाने प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

advertisement

पालकमंत्र्याकडे केली विनंती

आम्ही आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखील लग्नासाठी आमंत्रीत केले आहे, ते पण येणार आहे. आमचे पालकमंत्री हे संकटमोचक आहेत त्यामुळे ते काही ना काही तरी पर्याय करतीलच, असे नवऱ्या मुलीचे पालकांनी विनंती केली आहे.

युद्धाचे चटके घराघरांत

नाशिकमध्ये सध्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दोन हजारांचे सिलेंडर चार हजार रुपये देऊनही मिळेनासे झाले आहे. गॅस टंचाईचे हे संकट केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून, नाशिकमधील अनेक मंगल कार्यालये आणि कॅटरर्सनी बुकिंग घेण्यास नकार दिला आहे. युद्धाच्या या झळा आता थेट मध्यमवर्गीयांच्या आनंदाच्या सोहळ्यावर विरजण टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील या तणावामुळे भारताच्या स्वयंपाकघरावर काय परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिक तर आता गॅसअभावी किचन बंद करण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील गॅस तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक, व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
सर्व पहा

सावधान! गॅसचा काळाबाजार केल्यास थेट तुरुंगाची हवा; साठेबाजांना सरकारचा इशारा, यंत्रणा लागली कामाला  

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
युद्ध आखातात, झळा नाशिकच्या पंगतीला! 2000 वऱ्हाडी राहणार उपाशी; वधूपित्याची थेट प्रशासनाकडे धाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल