TRENDING:

Jalgaon: शेतात पेरणी करताना वीज पडली, तिघे जागीच गेले, दोन गंभीर जखमी

Last Updated:

Jalgaon News: जळगावमध्ये वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कोंगानगर शिवारात वीज पडून तीन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेतात पेरणी करताना वीज पडली
शेतात पेरणी करताना वीज पडली
advertisement

लखन दिलीप पवार, दशरथ उदल पवार व समाधान प्रकाश राठोड असे मृतांची नावे असून दिलीप उदल पवार व उदर गणपत पवार हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. चाळीसगावच्या रुग्णालयात जखमींना तातडीने दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

advertisement

शेतात पेरणी करत असताना वीज पडल्याने घडली घटना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मयत पवार आणि राठोड हे शेतात पेरणी करत होते. त्याचवेळेस शेतात वीज पडली. झालेल्या दुर्घटनेत तिघांचे जागीच प्राण गेले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरांचा चमू त्यांच्यावर उपचार करीत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: शेतात पेरणी करताना वीज पडली, तिघे जागीच गेले, दोन गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल