रेल्वे दुर्घटनेचे 10 मुद्दे
1 पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊहून मुंबईच्या दिशेने येत होती, तेव्हा ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली
2 आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसची चेन खेचली.
3 चेन ओढल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस थांबली, पण आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी उड्या मारायला सुरूवात केली.
4 पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारत असतानाच कर्नाटक एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने वेगाने जात होती.
advertisement
5 पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारत असताना भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक एक्सप्रेस प्रवाशांना दिसली नाही आणि हे प्रवासी कर्नाटक एक्सप्रेसखाली आले.
6 या भीषण अपघातानंतर घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
7 संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी लखनऊहून मुंबईच्या दिशेने पुष्पक एक्स्प्रेस जळगावहून निघाली, तेव्हा ट्रेनची चाकं आणि रुळांमध्ये घर्षण होत असल्यामुळे ठिणग्या पडत होत्या.
8 या ठिणग्या पाहून प्रवाशांना आग लागल्याचं वाटलं आणि त्यांनी पुष्पक एक्सप्रेसची चेन खेचली.
9 चेन खेचल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस थांबली आणि प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारायला सुरूवात केली. तेव्हाच कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडलं.
10 जखमी प्रवाशांवर वेळेत उपचार करायला उशीर झाला, कारण परधाडे ते पाचोरा हे अंतर जास्त आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांसाठी तीन हॉस्पिटलना अर्लट मोडवर ठेवण्यात आलं आहे.
