TRENDING:

Jalgaon Train Accident: रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह, पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेचं भयानक दृश्य

Last Updated:

पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी आग लागली अशी आवई उठवली त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव:  जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ (Jalgaon Pushpak Train Accident)  अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.
News18
News18
advertisement

पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवाशांनी आग लागली अशी आवई उठवली त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. मृत प्रवाशांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेली नाही.मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह  आढळून आले आहेत.

advertisement

ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा 

अचानक कोणीतरी ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यावेळी बंगळूरू एक्सप्रेस समोरून येत होती त्याखाली प्रवासी चिरडले गेले आहेत. यामध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही आग लागलेली नव्हती. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारल्याने काही ठिणग्या उडाल्या त्यानंतर आगीची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.

advertisement

35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जवळपास 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. यामध्ये सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. तीन रुग्णालयात प्रवाशांना हलवण्यात आली आहे.

रेल्वेने काय माहिती दिली?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

जळगावच्या माहेजीजवळ असताना पुष्पक एक्सप्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते   तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बंगळूरु एक्सप्रेसखाली आल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Train Accident: रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह, पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेचं भयानक दृश्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल