बॉम्ब शोध पथकाला तातडीने पाचारण
देशात सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्याने, रेल्वे स्थानकासारख्या संवेदनशील ठिकाणी बेवारस वस्तू मिळणे धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण परिसर सील केला. बॉम्ब शोध पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोध पथकाचे जवान अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. प्रत्येक हालचाल जपून करत, त्यांनी संशयास्पद कारची तपासणी सुरू केली. वेळेचं टिकटिक... बाहेर जमलेल्या लोकांच्या श्वासांची गती वाढली होती. 'काय निघणार आतून?' हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात थैमान घालत होता.
advertisement
रहस्यमय बीपचं काय?
अखेरीस, बराच वेळ चाललेल्या तपासणीनंतर कारचा दरवाजा उघडण्यात आला. आत... काहीही नाही! कोणतीही संशयास्पद वस्तू नव्हती. उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण या रहस्यमय बीपचं काय? पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना सांगितलं की, ही बेवारस कार एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही कार गेल्या चार ते पाच दिवसांपासून याच ठिकाणी उभी होती! मग हा बीपचा आवाज अचानक कसा सुरू झाला? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, तांत्रिक बिघाडामुळे कारमध्ये बीप वाजू लागला असावा. पण चार दिवसांपासून शांत असलेली कार आजच का वाजायला लागली? हा प्रश्न अजूनही रहस्य बनून आहे. रेल्वे स्थानकाच्या 'नो पार्किंग' क्षेत्रात कार उभी केल्याबद्दल संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पण या कारवाईपेक्षा, त्या रहस्यमय बीपच्या आवाजाने निर्माण केलेली दहशत अधिक गंभीर आहे.
स्थानकावर अनामिक भीतीचं सावट
दरम्यान, या घटनेने जळगाव रेल्वे स्थानकावर एक अनामिक भीतीचं सावट निर्माण केलं आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असले तरी, त्या बेवारस कार आणि तिच्या रहस्यमय आवाजाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. वेळेचं हे टिकटिक कशाचा इशारा देत होतं? सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
