TRENDING:

ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाआधीच मृत्यूनं गाठलं, आळंदीला जाणाऱ्या महिला कीर्तनकाराचा दुर्दैवी अंत

Last Updated:

नवी मुंबईच्या उरण येथून आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये भरधाव कंटेनर शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उरण येथील प्रसिद्ध महिला कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबईच्या उरण येथून आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये भरधाव कंटेनर शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उरण येथील प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार मंजुळा तांडेल (वय ५४) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे उरण आणि पनवेल परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
News18
News18
advertisement

गेल्या १८ वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिर येथून आळंदीपर्यंत पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीत उरणसह पनवेल परिसरातील अनेक लोक सहभागी होत असतात. यंदाही ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात उरण आणि परिसरातील जासई, करळ, कामोठे, पारगावसह इतर गावांतील सुमारे १५० भाविक सहभागी झाले होते.

advertisement

अपघाताची दुर्दैवी घटना

मंगळवारी रात्री कामशेत येथील काळभैरव मंदिर येथे मुक्काम करून, बुधवारी सकाळी ५.४५ वाजता ही दिंडी इंदुरीच्या दिशेने पुढे निघाली. काही अंतर पुढे गेल्यावर एका भरधाव कंटेनरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात उरण तालुक्यातील करळ येथील रहिवासी असलेल्या मंजुळा तांडेल यांचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

या अपघातात मंजुळा तांडेल यांच्यासह अन्य १० भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातात मंजुळा तांडेल यांची बहीण अपर्णा ठाकूर यांनाही फ्रॅक्चर झाले आहे. तर अन्य एक भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी कीर्तन सेवा केली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

मंजुळा तांडेल या गेल्या तीन वर्षांपासून या दिंडीमध्ये कीर्तन सेवा देत होत्या, तर त्या सुमारे सहा वर्षांपासून प्रवचन करीत होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कीर्तन सेवा केली होती, असे आयोजक धर्मा पाटील यांनी सांगितले. मंजुळा तांडेल यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा हितेंद्र आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाआधीच मृत्यूनं गाठलं, आळंदीला जाणाऱ्या महिला कीर्तनकाराचा दुर्दैवी अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल