जळगावमध्ये राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबतही प्रश्न करण्यात आले. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर झिरवळ यांनी थेट उत्तर दिले.
2100 रुपये देऊ कोण बोललं होतं?
advertisement
राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली." या योजनेत 2100 रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन सरकारने दिलेले नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
झिरवळ यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, "यापूर्वी विरोधक असा दावा करत होते की सरकार 1500 रुपये देखील देणार नाही. मात्र, सरकारने पंधराशे रुपये दिल्यावर विरोधक आता 2100 रुपयांचा मुद्दा उचलून धरत असल्याचे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, "माझ्या मते 1500 रुपयांची रक्कमही पुरेशी आहे आणि अनेक महिलाही मिळालेल्या मदतीबद्दल आनंदी असल्याचा दावा झिरवळ यांनी केला.
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊनही मानधनात कोणतीही वाढ झाली. विरोधकांनी यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर महायुतीच्या नेत्यांनी जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचे सांगितले होते. आता, मंत्री नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यानंतर महायुतीने दिलेल्या आश्वसनांवर प्रश्न उपस्थित झाले आहे.
