लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे आम्ही कोणीही म्हटलेले नाही, असे वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. तसेच १५०० रुपयांमध्ये राज्यातील लाडक्या बहिणी खूश आहेत, असेही ते म्हणाले.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आम्ही कोणीही म्हटलेले नाही-झिरवाळ
लाडक्या बहिणी नाराज आहे असे विरोधक सांगत आहेत परंतु सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आम्ही कोणीही म्हटलेले नाही. आम्ही पंधराशे रुपये देखील देणार नाही, असा प्रचार अगोदर विरोधकांनी केला. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही महिला खूश आहेत, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
advertisement
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली, मात्र सत्ता येताच आश्वासनाचा साफ विसर
'लाडकी बहीण योजना' ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिला, विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय भगिनींना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, दैनंदिन जीवनातील खर्चासाठी थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे, हा सरकारचा उद्देश आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महिलांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा राजकीय फायदा महायुतीला झाला.त्यामुळे 'लाडकी बहीण योजना' ही केवळ एक कल्याणकारी पाऊल नसून, महायुतीची निवडणुकीतील एक महत्त्वाची रणनीती म्हणूनही पाहिली गेली. मात्र सत्ता येताच सरकारमधील मंत्र्यांना दिलेल्या आश्वासनाचा साफ विसर पडलेला आहे.
