मृणालिनी किरण कुदळे (वय ५५) आणि सौरभ किरण कुदळे (वय २७ ) असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे. गुरुवारी पहाटे मृणालिनी यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कामाच्या निमित्ताने बंगळूर येथे असलेला त्यांचा मुलगा सौरभ किरण कुदळे (वय २७) हा तत्काळ आपल्या गावी सांगलीकडे निघाला.
आईच्या अचानक जाण्याने सौरभच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आईचे अंत्यदर्शन घेऊन तिला अखेरचा निरोप देण्यासाठी तो वेगाने प्रवास करत होता. इकडे समडोळी येथे कुटुंब मृणालिनी कुदळे यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीमध्ये गुंतले होते आणि मुलगा सौरभची वाट पाहत होते.
advertisement
नियतीचा क्रूर खेळ
नियतीने मात्र या कुटुंबासोबत अत्यंत क्रूर खेळ केला. सौरभ त्याच्या आईच्या अंत्यदर्शनासाठी वेगाने येत असताना, वाटेत त्याचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. कुटुंब मृणालिनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी सौरभची वाट पाहत असतानाच, त्यांना सौरभच्या अपघाती मृत्यूची हृदयद्रावक बातमी कळाली आणि कुदळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या काही तासांच्या अंतराने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
