बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शशांक राव यांनी म्हटले की, त्यांनी ही निवडणूक कामगारांच्या असंतोषाची लढाई होती. ही निवडणूक ९ वर्षांनंतर झाली. बेस्टची दशा कामगार सेनेमुळे झाली. कामगारांच्या हक्कांसाठी आम्ही लढलो आणि कामगारांनीच आम्हाला विजय मिळवून दिला असल्याचे राव यांनी सांगितले.
मी भाजपचा पण आमची युनियन...
राव यांनी भाजप नेते आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. 6 ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली, यात त्यांचे मोठे सहकार्य होते. आमची संघटना 1946 पासून काम करते आणि कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. भाजपने कामगारांच्या प्रश्नावर सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपचा सदस्य असलो तरी यूनियन संलग्न नसल्याचे शशांक राव यांनी स्पष्ट केले. शशांक राव यांच्या पॅनलच्या विजयानंतर हा भाजपचाच विजय असल्याचा दावा काहींकडून करण्यात आला होता.
advertisement
ठाकरेंवर टीकास्त्र...
शिवसेनेवर थेट टीका करताना राव म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी कामगारांना दिलेली वचने पाळली नाहीत. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन केला नाही, बसेस खरेदी केल्या नाहीत, कोव्हिड भत्त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांना झगडावे लागले. शिवसेनेच्या काळात बेस्टची अवस्था खालावली असल्याचे राव यांनी म्हटले. कोणताही ब्रॅण्ड जनताच तयार करते, असे टोलाही त्यांनी लगावला.
राव यांनी आश्वासन दिले की बेस्ट सोसायटीतील गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. भ्रष्टाचाराच्या चौकशीची आमच्या जाहीरनाम्यात तरतूद आहे,” असे ते म्हणाले.
आमच्या मागण्या राजकीयच...
शशांक राव यांनी म्हटले की, आम्ही कामगार चळवळीत आहोत. आमच्या मागण्या राजकीय आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडे मागण्या कराव्या लागतात. मी भाजप मध्ये आहे, भाजपच्या मदतीने आम्ही कामगारांचे प्रश्न सोडविले. कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही लढतो. काही मागण्या राजकीय स्वरूपाचा असतात त्यामुळे आम्ही त्याचा क्रेडिट त्या पक्षाला देतो असेही शशांक राव यांनी सांगितले.
