पारदर्शी निवडणूक व्हावी यासाठी 21 तारखेला निकाल
निवडणुका या पारदर्शी व्हायला पाहिजे, असं कोर्टाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगातर्फे पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे आजची निवडणूक होईल पण निकाल हा 20 तारखेच्या निवडणुकीनंतर होईल, असं कोर्टाने सांगितलं आहे. आजची नगरपरिषद आणि नगरपालिकेची निवडणूक होईल परंतू पारदर्शी निवडणूक व्हावी यासाठी सर्वांचे निकाल हे 21 तारखेला लागणार आहेत, अशी माहिती हायकोर्टाच्या वकिलांनी दिली आहे.
advertisement
निवडणूक आयोगाला सुनावलं
कोर्टाने यावेळी निवडणूक आयोगाला सुनावलं. निवडणूक आयोगाने निवडणुका फ्री अँड फेअर व्हावं यासाठी पाऊलं उचलण्यात हवी होती, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच कोर्टाने आदेश पारीत केला आहे. आचारसंहिता देखील कायम राहिल, असं कोर्टाने सांगितल्याचं वकिलांनी म्हटलं आहे. तसेच एक्झिट पोल देखील 20 तारखेच्या निवडणुकीनंतर होतील, असंही कोर्टाकडून आदेश देण्यात आला आहे.
21 तारखेला एकत्र लावला जाऊ शकतो का?
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. काल सोमवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने निवडणूक आयोगानाला निवेदन सादर करण्यास सांगितलं होतं. मंगळवारी 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाचा निकाल २१ तारखेला एकत्र लावला जाऊ शकतो का? अशी विचारणा केली होती. अशाच प्रकारची सुनावणी नागपूर खंडपीठासमोर देखील सुरू होती.
