उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव मनपा शाळेत होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे अतिरिक्त प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांनी वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना जारी केली आहे. या मार्गावरील वाहतूक काका हांडोरे चौकातून रोकडोबावाडी-खोलेमळा मार्गे आर्टीलरी सेंटररोडने अनुराधा चौकातून पुढे मार्गस्थ होईल. बदलाचे पालन करणे वाहनचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
MHADA HOME: म्हाडाचं घर फक्त 14 लाखांपासून; नाशिकच्या 'या' प्राईम लोकेशनवर हक्काचं घर मिळणार
अवजड वाहतूक इंदिरानगरमार्गे जाणार
पाथर्डी फाट्याकडून येणारी अवजड वाहने पाथर्डी गाव सर्कल येथून कलानगरमार्गे डावीकडे वळण घेत वडाळागाव-डीजीपीनगर-1 मार्गे पुढे पुणे महामार्गाकडे रवाना होतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे.






