TRENDING:

दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला तगडी टक्कर, डहाणूमध्ये काय होणार?

Last Updated:

डहाणूमध्ये भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी, डहाणू (पालघर) : डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्ष एकवटले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे.
पालघर नगर परिषद निवडणूक
पालघर नगर परिषद निवडणूक
advertisement

डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून नगराध्यक्षपदासह २७ नगरसेवकांच्या जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचे पहायला मिळाले.

आम्ही स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी भाजपला आव्हान दिले आहे. तर भाजप विरोधात यावेळी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि माकपचा देखील पाठिंबा मिळण्याची शक्यता रविंद्र फाटक यांनी बोलून दाखवली. भाजपविरोधात सर्वपक्षियांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा असल्याचे अप्रत्यक्षपणे रविंद्र फाटक म्हणाले.

advertisement

राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूक होणार आहे.

advertisement

निवडणूक कार्यक्रम कसा असणार?

-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५

-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५

-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५

-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५

-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५

-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला बुक कॅफे, काय आहे खास?
सर्व पहा

-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला तगडी टक्कर, डहाणूमध्ये काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल