संजय राऊतजी... काळजी घ्या - नितेश राणे
संजय राऊत नेहमी राणे कुटुंबियांवर आरोप करताना दिसतात. तर नितेश राणे यांनी देखील अनेकदा संजय राऊत यांच्यावर नको त्या शब्दात टीका केली आहे. मात्र, जसं संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी नितेश राणे यांना कळालं. तेव्हा नितेश राणे यांनी ट्विट करत काळजी व्यक्त केली. एक्सवर पोस्ट करत "संजय राऊतजी... काळजी घ्या. लवकर बरे व्हा!" असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांची पाच शब्दाची पोस्ट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी शिकवण आहे.
advertisement
नरेंद्र मोदीचं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतविरुद्ध नितेश राणे
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2023 मध्ये दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायालयाने गुरुवारी भाजप नेते नितेश राणे यांना सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्यास गुरूवारी नकार दिला होता. त्याचवेळी राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक टीका केली होती.
