TRENDING:
LIVE NOW

बारामती पंचायत निवडणूक निकाल 2026 LIVE: अजितदादांशिवाय पहिली निवडणूक, पंचायत समितीवर कोण 'राज' कारणार? थोड्याच वेळात निकाल

Last Updated:

Baramati Panchayat Election Result 2026 LIVE updates. बारामती तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 साठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामतीतील विविध गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत असून, कोणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामती पंचायत निवडणूक निकाल 2026 LIVE:  अजित पवारांच्या अनुपस्थितीत बारामतीत आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्यातील मतमोजणी केंद्रांवर प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ५४.९० टक्के इतकं कमी मतदान झालेल्या बारामतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रचाराच्या काळातच अजित पवार यांचं निधन झाल्याने मतदारांमध्ये दिसलेली शांतता आणि अलिप्तपणा आज निकालात कसा व्यक्त होतो, याची उत्सुकता आहे. पहिल्या फेऱ्यांत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू असून, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी होणार आहे. PRAB च्या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला आघाडीचा अंदाज आहे, मात्र अजित पवार नसलेल्या बारामतीत मतदारांनी कोणता संदेश दिला, हे आज स्पष्ट होणार आहे.
बारामती पंचायत समिती
बारामती पंचायत समिती
advertisement
Feb 09, 20269:24 AM IST

कुटुंबीयांनी मतदान केलं, पण गर्दी दिसली नाही

निवडणुकीच्या दिवशी पवार कुटुंबीयांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. मात्र, अपेक्षेप्रमाणे मतदारांची गर्दी अनेक केंद्रांवर दिसून आली नाही. “निवडणूक आहे, हेच मन स्वीकारायला तयार नव्हतं,” अशी प्रतिक्रिया काही स्थानिक मतदारांनी दिली. अजितदादांच्या निधनाचं दुःख अजूनही ताजं असल्याचं नागरिक सांगत होते.
Feb 09, 20269:07 AM IST

उमेदवारांचे भवितव्य मतभेती मध्ये बंद

बारामती जिल्हा परिषदेसाठी 31 आणि पंचायत समितीसाठी 43 उमेदवारांचे भवितव्य मतभेती मध्ये बंद झाले असून ते आज थोड्याच वेळात मतमोजणीनंतर उलगडणार आहे.. पहिल्या निकालाला साधारण बारा वाजतील अशी शक्यता आहे यासाठी प्रशासनाने जयत तयारी केल्याच पहायला मिळत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
Feb 09, 20269:00 AM IST

मतमोजणी सकाळी दहा वाजता

आज राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.. बारामती जिल्हा परिषद पंचायत समिती साठी एकूण 54.90% मतदानाची टक्केवारी झालेली आहे.. तर इंदापूर मध्ये 65. 67% मतदानाची टक्केवारी झाली आहे.. झालेल्या मतदानाच्या मतपेट्या आहेत ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत मतमोजणी बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.. मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे.. या मतमोजणीसाठी 26 टेबल आणि टपाली दोन असे 28 टेबल लावण्यात आले आहेत.
advertisement
Feb 09, 20268:52 AM IST

54.90% मतदानाची टक्केवारी

बारामती जिल्हा परिषद पंचायत समिती साठी एकूण 54.90% मतदानाची टक्केवारी झालेली आहे.. तर इंदापूर मध्ये 65. 67% मतदानाची टक्केवारी झाली आहे.. झालेल्या मतदानाच्या मतपेट्या आहेत ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत मतमोजणी बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे..
Feb 09, 20268:39 AM IST

2014: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका

मागील वेळेस झालेल्या 34 जिल्हा परिषद (जिप) आणि त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या 351 पंचायत समित्यांच्या (पंस) निवडणुकांमध्ये राज्यातील तत्कालीन सत्ताधारी भाजपला विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कडवी टक्कर मिळाली होती. 2014 ते 2018 या कालावधीत 34 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.
Feb 09, 20268:28 AM IST

बारामतीत यंदा वेगळंच चित्र

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना एकूणच समाधानकारक प्रतिसाद मिळाला. राज्यभरात सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदान झालं. मात्र, पवार कुटुंबीयांचा राजकीय गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
advertisement
Feb 09, 20268:10 AM IST

जिल्हा परिषदेसाठी केवळ ५४.९० टक्के मतदान

बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी केवळ ५४.९० टक्के मतदान झालं. पुणे जिल्ह्यात हा आकडा सर्वांत कमी ठरला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
Feb 09, 20267:49 AM IST

शोकातून बाहेर न आलेली बारामती?

राजकीय निरीक्षकांच्या मते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला. प्रचाराच्या दरम्यानच २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली होती.
Feb 09, 20267:49 AM IST

राज्याचे लक्ष बारामतीकडे

बारामतीत सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती करिता आज मतमोजणी होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामती पंचायत निवडणूक निकाल 2026 LIVE: अजितदादांशिवाय पहिली निवडणूक, पंचायत समितीवर कोण 'राज' कारणार? थोड्याच वेळात निकाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल