TRENDING:

Video तुम्ही आत गेलातच कसे? शिरूरमध्ये आजी माजी आमदार एकमेकांना भिडले

Last Updated:

शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिरूर : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीदरम्यान विविध ठिकाणी नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांदरम्यान संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्यावरून शा‍ब्दिक वाकयुद्ध रंगले.
अशोक पवार आणि माऊली कटके
अशोक पवार आणि माऊली कटके
advertisement

आजी-माजी आमदार भिडले

शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली. विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात गेल्याने माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. लोकप्रतिनिधी आहात, कायद्याने वागायला शिका, अशा शब्दात अशोक पवार यांनी आमदार कटके यांना सुनावले. तसेच निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अशोक पवार यांनी केली. त्यावर कायद्याने वागण्याचा सल्ला आम्हाला देऊ नका, आम्ही कायद्यानेच लागतो, आम्ही काही चुकीचे केलेले नाही, असे प्रत्युत्तर कटके यांनी दिले. पराभव दिसायला लागताच पायाखालची वाळू सरकली काय? असा निशाणाही कटके यांनी पवारांवर साधला.

advertisement

मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता येत नाही, असा कायदा असल्याचे सांगत आमदार अशोक पवार हे आक्रमक झाले. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे माजी आमदार अशोक पवारांनी म्हटले. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात गालबोट लागलंय.

निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार, सत्ताधारी विरोधकही नाराज

नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल लागणार होता. मात्र न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे २४ नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक पुढे ढकलण्याची करामत निवडणूक आयोगाने केल्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त करीत कडाडून टीका केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्याहून मतदानाला आलो, पण मतदान केंद्रावर.., जालन्याच्या आनंद सोबत अजब घडलं?
सर्व पहा

एकतर नगर पालिका निवडणुका पाच पाच वर्षे रखडलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि उमेदवार निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होत नव्हते. अखेर २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल लागेल, याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. परंतु न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे निवडणूक आयोगावर निवडणूक पुढे ढकलण्याची नामु्ष्की ओढावली. अगदी निवडणुकीला काही तास शिल्लक असताना आयोगाने निवडणूक पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. यावरून राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आयोगावर आरोपांची राळ उडवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video तुम्ही आत गेलातच कसे? शिरूरमध्ये आजी माजी आमदार एकमेकांना भिडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल