नेमकं काय झालं?
पुष्पक एक्सप्रेस ही नेहमीप्रमाणे प्रवास करत आहे. अचानक कोणीतरी ट्रेनमध्य आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यावेळी बंगळुरू एक्सप्रेस समोरून येत होती त्याखाली प्रवासी चिरडले गेले आहेत. यामध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही आग लागलेली नव्हती. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारल्याने काही ठिणग्या उडाल्या त्यानंतर आगीची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.
advertisement
Pushpak Express Accident
पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना 4:20 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
दरम्यान, घटनास्थळावरील 108 अॅम्ब्युलन्स अॅक्टिव करण्यात आल्या आहेत. प्रांतअधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस अधिकारी देखील तिथं पोहोचले आहेत. तीन हॉस्पिटल्सला तातडीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे.
