TRENDING:

Accident News : कंटेनर पलटी होऊन कारचा चुराडा, सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इगाप्पागोळ हे ख्रिसमसची सुट्टी पडल्याने आपल्या कुटुंबियाना घेऊन चारचाकीने गावी निघाले होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli News Accident : आसिफ मुरसल,सांगली : बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक हादरवून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एक भरधाव ट्रक पलटी झाला आहे. हा ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात सांगलीच्या जत गावातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेने जत गावात शोककळा पसरली आहे.
Sangli News Accident
Sangli News Accident
advertisement

सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इगाप्पागोळ हे ख्रिसमसची सुट्टी पडल्याने आपल्या कुटुंबियाना घेऊन चारचाकीने गावी निघाले होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक थेट इगाप्पागोळ यांच्या कारवर पलटी झाला होता.त्यामुळे मोठा अपघात घडला होता आणि कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला होता.

advertisement

बंगळुरु जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुलगी दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

advertisement

दरम्यान चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बंगळुर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. या अपघातात इगाप्पागोळ यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जत गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सूरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : कंटेनर पलटी होऊन कारचा चुराडा, सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल