सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या फुटबॉलपटू आणि शालेय विद्यार्थ्यांने आईने वाढदिवसाला नवीन मोबाईल न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी ५ च्या दरम्यान घराच्या टेरेसवर तो मृत अवस्थेत आढळून आला. या आत्महत्यने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
advertisement
नववीत शिकणारा हा मुलगा हा आपल्या आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठ येथे वास्तव्यास होता. तो एक उत्कृष्ट फुटबॉलपट्टू देखील होता. आणि पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता. पण त्याआधीच त्याने आयुष्याचा शेवट करून घेतला आहे.
या मुलाचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. त्यावेळी त्याने आईकडे नवीन मोबाईल घेऊन द्यायची मागणी केली होती. त्याची आई एमआयडीसीत काम करायची. या कामातून कसंबलं त्याचं घर चालायच.त्यात मोबाईल घेऊन द्यायचं म्हणजे अवघड होतं.त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती नसल्याने आईने त्यास नकार दिला होता.
आईच्या नकारामुळे तो दोन दिवस आईशी नाराज होता. त्यानंतर शनिवारी तिसऱ्या दिवशी मध्यरात्री आई आणि बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या गच्चीवर गेला आणि त्याने सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र मोबाईल मुले जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.