संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेत राज्यापासून ते देशातील अनेक गोष्टींवर ते भाष्य करायचे. पण सध्या आजारी असल्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा बंद आहेत . विरोधकांनी केलेला प्रत्येक वार आपल्या रोखठोक तर कधी मिश्किल शैलीत त्यांनी परतवून लावलाय.मात्र आजारी असल्याने सडेतोड उत्तरे देणं बंद असले तरी आपल्या लेखणीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांवर बोचरा वार करत आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत असताना संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणासे, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही . निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते.. एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना 50 च्या आत संपवले.
संजय राऊत माध्यमांपासून का दूर आहेत?
दोन महिने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सार्वजनिक जीवनापासून थोडं लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राऊत सध्या कॅमेऱ्यापासून लांब आहेत. दोन महिन्यांनी मी पुन्हा ठणठणीत होऊन येईन असं संजय राऊत म्हणाले आहेत.
काय आहे महाराष्ट्र पॅटर्न?
बिहारमध्ये यंदा प्रथमच जेडीयू आणि भाजपनं समान जागा लढवल्या आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. पैकी भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच पायरीवर आहे. त्यामुळे दोघांमध्ये मोठा भाऊ कोण ठरतं याकडे लक्ष लागलं होतं. सध्याच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे. भाजप 90 ,लोजप 22, हिंअमो 5, रासोमो 3 जागा मिळाल्या आहेत. तर जेडीयूला 78 जागा मिळाल्या आहेत. आकडेवारी विचारात घेतली तर जेडीयुशिवाय देखील भाजप सत्ता स्थापन करू शकते. कारण जेडीयू शिवाय इतर मित्र पक्षांना मिळालेल्या जागा आणि भाजपला मिळालेल्या जागा यांची बेरीज घेतली केली तर भाजप बहुमताचा जादुई आकडा सहजरीत्या गाठू शकतो. जेडीयुशिवाय जर भाजपने जर पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर 120 जागांपर्यंत जाता येणार आहे. म्हणजे जे शिवसेनेसोबत झालं तसेच चित्र बिहारमध्ये पाहायला मिळत आहे.
