मी ठणठणीत बरा होऊन येईन- संजय राऊत
संजय राऊतांनी ट्विटर हँडलवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक लिहिलं होतं. सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्विटरवर राऊतांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंची पोस्ट व्हायरल झाली.
advertisement
काळजी घे संजय काका.... - आदित्य ठाकरे
काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्याला उत्तर देत संजय राऊत यांनी धन्यवाद my dear Aaditya, असं म्हणत उत्तर दिलं आहे. राऊतांचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. तर नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांना काळजी घेण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
नरेंद्र मोदी यांची राऊतांच्या प्रकृतीवर पोस्टवर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांच्या पोस्टवर व्यक्त होताना म्हटलं आहे की, "संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना". दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत काळजी घ्या, लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे. शिवसेना (युबीटी) नेते म्हणून संजय राऊत यांची सक्रियता महत्त्वाची असते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या कार्यक्रमांवर परिणाम होऊ शकतो.
