रणजीत कासले यांच्या गौप्यस्फोटानंतर आता बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं आहे. रणजीत कासले हा गुरुवारी दिल्लीवरून पुण्यात आला होता. काल पुणे विमानतळावर आल्यानंतर रणजीत कासले यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले होते. आपल्या खात्यात दहा लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा देखील केला होता.
advertisement
तसेच आपण पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार आहे, असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं. यानंतर तो पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला होता. त्याने पोलिसांकडे सरेंडर व्हायच्या आधीच आज पहाटे रणजीत कासले याला मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पहाटे पाचच्या सुमारास पाच ते सहा पोलिसांनी कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये छापेमारी केली आणि त्याला ताब्यात घेतलं. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून पोलीस कासलेला घेऊन जाताना दिसत आहेत.
