मुंबईसह उपनगरात गारठा वाढला आहे. गार अल्हाददायक वातावरण असल्याने मुंबईकर सुखावला आहे. गुलाबी थंडीची मजा घेत आहेत. तर दुसरीकडे मात्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे तापमानाचा पार घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापमान कमी असल्याने नागरिकांसाठी इशारा देण्यात आला आहे. ४८ तास महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान ४ डिग्रीने घसरण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश आणि उत्तर पूर्व राजस्थानकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा परिणाम हवामानावर होत आहे. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान थंडीची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट आली आहे. त्यामुळे विदर्भात अलर्ट जारी करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. दर दक्षिणेकडे केरळच्या जवळ अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात सतत बदल होत आहे. केरळ, तामिळनाडू या भागांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमान रात्री आणि पहाटेच्या वेळी 4 डिग्रीने खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही बदल होणार नाहीत. कमाल तापमान 30 डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवसांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये; उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सकाळही आल्हाददायक असेल.
