राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले काका शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी बारामतीत मेळावा घेतला. त्यावेळी एका कार्यकर्त्याने आपल्याच पक्षातील काही पदाधिकारी विरोधात काम करतात, अशा स्वरूपाची चिठ्ठी अजित पवारांना दिली. त्यानंतर अजित पवारांच्या भाषणाचा नूरच बदलला. झालं गेलं गंगेला मिळालं... माझंही साहेबांवर प्रेम आहे, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या शक्यता असल्याचेच अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार काका पुतण्याच्या राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्या. एवढचं काय पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली.तर विधानसभेत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवारांनी आव्हान दिलं होतं. पण आता फुटीनंतर काका-पुतण्यातील राजकीय विरोधाची धार बोथट होत असल्याचं चित्र आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले काका शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी बारामतीत मेळावा घेतला. त्यावेळी एका कार्यकर्त्याने आपल्याच पक्षातील काही पदाधिकारी विरोधात काम करतात, अशा स्वरूपाची चिठ्ठी दिली अजित पवारांना दिली. त्यानंतर अजित पवारांच्या भाषणाचा नूरच बदलला. मला निवडून द्यायला पवारच कारणीभूत आहेत. कालपर्यंत आपण एकत्र होतो ना.. असे अजित पवार म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच अजित पवारांनी या मेळाव्यात मोठं वक्तव्य केलंय.
'झालं गेलं गंगेला मिळालं, माणसं नेहमी जोडायची असतात' असे अजित पवार म्हणाले.
पुण्यातील कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी प्रकरणावरून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवारांना घेरलंय. या प्रकरणामुळं कोंडीत सापडलेल्या अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता असा दावा अंबादास दानवेंनी नुकताच केलाय. सत्ताधाऱ्यांनी दानवेंचे हे आरोप फेटाळून लावलेत. एकूणच एकूणच राजकीय कोंडीत सापडलेल्या अजित पवारांना आता अडचणीच्या क्षणी काका शरद पवारांची आठवण आली का याची चर्चा सुरू झालीय.
