ज्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुतळे जाळले गुलाबराव पाटील यांच्यासाठी पोलीस स्टेशनला आंदोलन केलं, निवडणुकीपर्यंत विरोधात काम केलं ते इकडे आल्याबरोबर जिल्हाप्रमुख कसे होतात असे म्हणत माजी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी विष्णू भंगाळेंवर टीका केली आहे.
निलेश पाटील म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विष्णू भंगाळे यांच्या पदाला स्थगिती दिली होती. मात्र गुलाबराव पाटलांचा मुद्दा पुढे करून विष्णू भंगाळे यांना कायम ठेवले आहे.
advertisement
निलेश पाटलांचा टोला
तर निलेश पाटील हे राष्ट्रवादीमधून आल्यावर त्यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आलं होतं, मी तर खरा शिवसैनिक आहे. एका व्यक्तीमुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत नसतो मी मोठा ही गुर्मी चुकीची असे म्हणत विष्णू भंगाळे यांनी निलेश पाटलांना टोला लगावला आहे.
विष्णू भंगाळेचा निलेश पाटलांवर निशाणा
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विष्णू भंगाळे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली होती. मात्र गुलाबराव पाटलांनी विष्णू भंगाळे त्यांचे पद कायम ठेवले असल्याचा आरोप निलेश पाटील यांनी केला आहे. तर निलेश पाटील हे राष्ट्रवादीकडून आलेले जिल्हाप्रमुख…खरा शिवसैनिक मी…एका व्यक्तीमुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत नसून मी मोठा ही गुर्मी चुकीची असल्याचे म्हणत विष्णू भंगाळे यांनी निलेश पाटलांवर निशाणा साधला आहे.
संभाजीनगरमध्ये आजी-माजी मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू असल्याचं समोर येत आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत. जाहीर सभेत संजय शिरसाट यांनी सत्तार यांचा समाचार घेतला. आता अब्दुल सत्तार शिरसाट यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत
