शेख बाब अत्यंत गंभीर असून, शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा उघड झालेला संबंध आणि त्याच्या संपर्कात महाराष्ट्रात कोण कोण होते याची देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट मत व्यक्त करत सांगलीचे ज्येष्ठ मल्ल वस्ताद संजय भोकरे यांनी सिकंदर शेखच्या अटकेबाबत आपली थेट भूमिका मांडली आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी करा, वस्तादांची मागणी
advertisement
ज्या महाराष्ट्राने सिकंदर शेख ला डोक्यावर घेतलं तो महारष्ट्र चुकीला पाठीशी घालणार नाही, सिकंदरच्या कुटुंबीयांकडून केल्या जाणार आरोपाचे खंडन देखील चुकीच आहे. एखाद्या खेळाडू बाबत कुणीच खोटे आरोप करणार नाही ,दुसरीकडे सिकंदर शेखच्या विरोधात पुरावे देखील मिळतायेत ,त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी देखील भोकरे यांनी मागणी केली आहे.
सिकंदरच्या कारनाम्यामुळे कमावलेली प्रतिष्ठा डागाळली
सिकंदर शेख शस्त्र तस्करीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिकंदर मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे. कोल्हापुरातील तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यामुळे त्याचं नाव महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलं. त्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला. मात्र, नोकरी सोडून दिली होती.
महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर सिंकदरने मागे वळून पाहिलं नाही. सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. सिकंदर हा पदवीधर असून गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये शस्त्र पुरवठा साखळीत तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्यामुळे अत्यंत गरीब घराण्यातून पुढे आलेल्या सिकंदरच्या कारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा डागाळली आहे.
हे ही वाचा :
