वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे?
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. या सोसायटीमधील आयव्हरी इमारतीच्या 6 व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 करोड पेक्षा अधिक किमतीचा 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफसी रस्ता आहे. एफसीरोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यामध्ये पार्टनर आहे. तिथे एफसी रोडवर कराडने सात दुकानं बुक केली आहेत.
advertisement
पुणे, लातूर, परळी, केजसह इतर ठिकाणी रो हाऊस. केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला - किंमत 1 कोटी 69 लाख रुपये. बीडच्या दगडवाडीमध्ये शेत जमीन - किंमत 48 लाख 26 हजार. मौजे तडोळी इथं 12 एकर शेत जमीन - किंमत 20 लाख 27 हजार.परळी रोडवर अंबाजोगाई इथं 380 चौ.मी. बांधकाम. अंबाजोगाईमध्येच 419 चौ.मी. बांधकाम. बीडच्या दगडवाडीत स्टोन क्रेशर युनिट. दगडवाडी गावात 48 लाखांची शेत जमीन. परळीतील वडगावात साडेच्या सिरसाळा गावात (गट 581) चार एकर शेत जमीन. वडगावातच आणखी एक प्लॉट. आणि बीडला ५०० चौ.मी खुला प्लॉट
खून आणि खंडणी प्रकरणात माझा सहभाग नाही, मला दोषमुक्त करा, कराडचा सुटकेसाठी अर्ज
अशी प्रचंड माया वाल्मिक कराडनं जमवलीय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात संबंध नसल्याचा दावा वाल्मिक कराडनं कोर्टात केला असून सुटकेसाठी अर्ज करण्यात आलाय.
खून आणि खंडणी प्रकरणात माझा सहभाग नसल्याने मला दोषमुक्त करा, अशी मागणी वाल्मिक कराडने केली. देशमुख खुनात माझ्या विरोधात पुरावा नाही. सहभाग असल्याचेही सिद्ध होत नाही. त्याशिवाय, मी खंडणी मागितल्याचेही समोर आले नाही असे कराडने आपल्या दोषमुक्तीच्या अर्जात म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी वाल्मिकने ही चाल खेळल्याचे बोलले जाते.
आरोपींच्या चेहऱ्यावर भीती नाही, त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट
दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही, यावरून त्यांना जेलमध्ये कशी वागणूक मिळते, हे स्पष्ट होतं असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच विष्णू चाटे याला लातूर जेलमधून बीडमध्ये शिफ्टिंग हवे आहे. एकत्र येऊन त्यांना पुन्हा दुसरा प्लॅन रचायला असेल, अशी शंकाही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातील भयावह दहशतीची धक्कादायक माहिती राज्याला झाली होती. त्यामुळे देशमुख हत्या खटल्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. खटल्याच्या कार्यवाहीत वाल्मिक कराडची संपत्ती जमा करण्याची मागणी करण्यात आलीय. या मागणीवर काय निर्णय होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
