पालघर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होत असताना आणि प्रशासन मतदानकामी गुंतलेले असताना वसईच्या पापडी येथील साई योग बंगल्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बंगल्याच्या बाहेर मोठी पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हॉटेल व्यवसायिकाचे नाव शेट्टी असल्याचे कळते. कर चुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने बंगल्यावर छापेमारी केल्याचे कळते. प्राथमिक माहितीनुसार काही महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाताला लागल्याची माहिती आहे.
advertisement
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
December 02, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीच्या धामधुमीत वसईत आयकर विभागाचे छापे, हॉटेल व्यवसायिकाच्या बंगल्यावर धाड
