वर्धा : होळी, धूलिवंदन खेळायला पूर्वी पळसाच्या फुलांपासून बनवलेला रंग वापरला जायचा. कालानुरूप त्यात बदल होऊन त्याची जागा आता कृत्रिम, रासायनिक रंगांनी घेतलीय. मानवाने नैसर्गिक गोष्टींचा त्याग केला असला,तरी पळसाच्या गडद केशरी फुलांनी बहरणे कायम आहे. होळीला पळसाच्या फुलांपासून बनलेले रंग खेळण्याची परंपरा कशी सुरू झाली? आणि हे नैसर्गिक रंग खेळण्याचे काय फायदे आहेत? याचीच माहिती यवतमाळ येथील वनस्पती अभ्यासक आणि माजी मुख्याध्यापक नरेंद्र पवार यांनी दिली आहे.
advertisement
काय आहेत फायदे?
पळसाच्या फुलांपासून जो रंग तयार होतो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृष्णाने राधेच्या अंगावर किंवा गोपिकांच्या अंगावर जो रंग टाकला होता तो पळसाचाच रंग होता. या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग आरोग्यास हितकारक आहे. आजकाल बाजारात केमिकल युक्त विषयुक्त रंग वापरले जातात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. मात्र पळसाचे रंग खेळल्यामुळे तारुण्यपण टिकून राहते, चेहरा खुलतो, चेहऱ्याला गोरेपण येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या वगैरे कमी करण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जायचा. हे एक भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होतं, असं नरेंद्र पवार सांगतात.
मनोरुग्णांनी तयार केला पळसाच्या फुलांचा रंग; अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश Video
पळस हे असे झाड आहे ज्याचे पान, फुल, खोड, मूळ, फुलं, बिया, साल हे आयुर्वेदिक गुणांनी औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. पळस हा जीवनाचा शिल्पकार म्हटलं तरी चालेल. अतिशयोक्ती होणार नाही. पळसाची फुले पाण्यात भिजू घालायची त्याचा रंग सुटायला लागतो, त्यानंतर गरम पाण्यात त्याला मिक्स करून गाळून घेऊन त्याचा नैसर्गिक रंग तयार होतो. अतिशय जुन्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे, असं नरेंद्र पवार यांनी सांगितलं.
11 वर्षांचा निर्मल देतोय पर्यावरण रक्षणाचे धडे, टाकाऊ वस्तूंपासून साकारलं केदारनाथ मंदिर, Video
प्राचीन काळापासून पळसाचा आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले, तर त्वचारोग नाहीसा होतो, असं आयुर्वेदात सांगितलं जातं. पळसाच्या बियांचाही औषधासाठी वापर केला जातो आणि अशाप्रकारे माणसाला पळसाच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असंही नरेंद्र पवार यांनी सांगितलं.





