याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी पारडी येथील एका तरुणासोबत पळून गेली होती. दोघांचाही गेल्या पंधरा दिवसांपासून शोध सुरू होता. मात्र त्यांचे मृतदेह कुसूमदोडा शेतशिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडले. दोघांनीही एकमेकांना ओढणीने घट्ट बांधून विहिरीत उडी मारल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी म्हटलं आहे. तरुणाचे नाव हर्षल बाबा वाघाडे असं आहे. त्याच्यासोबत पळून गेलेली मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.
advertisement
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर एक दिवस तिचा शोध घेतला. पण ती न सापडल्याने तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दोघांचे मृतदेह एका विहीरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मृतदेह कुजलेले असल्याने शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
